मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपचा वाद टोकाला जाणार हे जवळपास निश्चित आहे. कारण या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेतच, शिवाय आता उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांना भाजपने पाचारण केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकाच दिवशी म्हणजे 23 मे रोजी आमने सामने येणार आहेत.
एकाच दिवशी सभा
उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांची बुधवारी 23 मे रोजी नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे.
नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं आहे.
कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नालासोपाऱ्यात सभा घेत, शिवसेनेसह स्थानिक बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली होती. या सभेसाठीही भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची उपस्थिती होती.
दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, 23 मे री पोलिंसांच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री आमने-सामने
पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनीही उडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत.
नालासोपाऱ्याला 23 मे रोजी तर तर दुसरी सभा भोईसरला 25 मे रोजी होणार आहे.
पालघर पोटनिवडणूक
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
28 मे रोजी पोटनिवडणूक
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.
अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार
अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार, असं ट्विट करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
पेट्रोलच्या भाववाढीवरुन आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
आदित्य ठाकरेंचं ट्विट
‘अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार’ असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं.
मुंबईत पेट्रोल ₹ ८४!! २०१४ चा प्रचार विसरलोच... “बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार. कर्नाटका निवडणुकीनंतर भाव वाढले.. कदाचित डिसेंबरमध्ये परत निवडणुकीसाठी कमी करतील.. पण भारतीय जनतेला वचनं दिली, ती पूर्ण का नाही करू शकत केंद्र सरकार? असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
Post a Comment