आमची ती "स्ट्रॅटेजी" तुम्ही केली तर फोडाफोडी !
मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश काय केला तर लगेच भाजप वाल्यांनी एकच "गजहब" केला !
मनसे आणि राज ठाकरे यांचा राग समजू शकतो पण त्यावेळी भाजप का एवढा "लाल" झाला? त्या नगरसेवकांवर धाडी टाकणाच्या वगैरे भाषा करू लागले, कोकण आयुक्ताकडे स्वतः धावाधाव करू लागले !
पण तेच भाजप सत्तास्थापनेसाठी आता कर्नाटकात काय करतंय !
कोटी कोटीची खिरापत वाटतय !
हमाम मे सब नंगे असं वाचलं होतं !
राजकारणात सुद्धा तेच चित्र आहे !
पण "पार्टी विथ डिफरंस" आणि संघाचे तथाकथित "संस्कारी"भाजप सुद्धा असा घोडा बाजार करते तेव्हा ते जास्त "नंगे" ठरतात !
असो ! माझ्या या वादाला प्रतिवाद करण्याआधी तुमच्या करातले पैसे सुद्धा त्या १०० करोडच्या खिरापतीत आहेत याच भान ठेवा !
जय महाराष्ट्र !

Post a Comment

Previous Post Next Post