छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.स्वतः छगन भुजबळ यांनीच त्यांना पेढे घेऊन धाडल्याची चर्चा असल्याचे वर्तवले जात आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ गेली 2 वर्षे तुरुंगात होते, त्यानंतर नुकताच त्यांना जामीन मंजूर झाली असून त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय.
दरम्यान,छगन भुजबळ लवकरच आपली राजकीय दिशा स्पष्ट करतील, मात्र पंकज यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
إرسال تعليق