मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ नाटकांच्या रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन उभारले जाईल, अशी घोषणा केली.
मुलुंड येथे बुधवारपासून सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक समारोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
दरम्यान, यावर्षी सांगता झालेले नाट्यसंमेलन ९८वे आहे. दोन वर्षांनी शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन होईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असला, तर तेव्हाही कदाचित मीच सांस्कृतिक कार्यमंत्री असेन. अशी कोपरखळी विनोद तावडे यांनी मारली. त्यावर थेट भाष्य न करता मराठी माणूस म्हणून एकत्र या, असा सल्ला उद्धव यांनी आपल्या भाषणात दिला.
إرسال تعليق