खाजगी क्लासेसच्या वाढी मुले अकरावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावत चालली आहे. यावर उपाव म्हणून राज्य सरकारने यापुढे आणि बारावीच्या विज्ञान विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना आपली हजेरी बायोमेट्रिकवर देणे बंधनकारक केले आहे
विशेष म्हणजे नामांकित महाविद्यालयांमध्ये सुद्धा अकरावी-बारावीचे वर्ग ओस पडत असताना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मात्र बसायलाही जागा राहत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अकरावी-बारावीच्या वर्गातही हजेरी लावली पाहिजे, हे धोरण आता सरकारने ठरवले आहे.
अनेक महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घेऊन खाजगी क्लासेससोबत सामंजस्य करार केला आहे. याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. तसंच विधीमंडळातही अनेकदा हा प्रश्न चर्चिला गेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी विज्ञान शाखेच्या सर्व प्रकारच्या कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
ही योजना टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार असून चालू शैक्षणिक वर्षासाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या पाच विभागातील विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून बायोमेट्रिक उपस्थिती घेण्यात येणार आहे.
यासाठी येत्या 15 जुलैपर्यंत महाविद्यालयांना स्वखर्चाने आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करावी लागणार आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी अचानक भेट देऊन या यंत्रणेची पाहणी करणार आहेत. जी कनिष्ठ महाविद्यालये ही पद्धती अवलंबणार नाहीत, त्यांची मान्यता काढून घेण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असा इशाराही शासनाने दिला आहे.
إرسال تعليق