पुणे : राजकीय पक्ष येतात आणि जातात, पण ते समाजकारण किती करतात हा प्रश्न असतो. मात्र शिवसेना १०० टक्के समाजकारण करते असा दावा, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागातर्फे पुण्यात आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळामध्ये ते बोलत होते. ८० - ९० च्या दशकात फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळेच महाराष्ट्रात ७० टक्के रोजगार भूमिपुत्रांना मिळाल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. पुण्यातल्या उरुळी देवाची गावात हा रोजगार मेळावा होत आहे. विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी थेट मुलाखतीसह स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे.
0982221177
ردحذفإرسال تعليق