राजापूर : राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत येत असतानाच गतवेळी भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे रवींद्र बावधनकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिवसेनेला बळ मिळाले आहे.
येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रवेश पार पडला. एक संघटक म्हणून बावधनकर यांचा परिचय असून खासदार राऊत यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासमवेत राजन करंगुटकर व अन्य कार्यकर्ते यांचाही सेना प्रवेश झाला. बावधनकर यांचासारखा खंदा कार्यकर्ता शिवसेनेत येण्यासाठी आमदार साळवी यांनी भूमिका बजावली.
बावधनकर यांचासारखा खंदा कार्यकर्ता शिवसेनेत येण्यासाठी आमदार साळवी यांनी भूमिका बजावली.
إرسال تعليق