घनसावंगी :- १ जुलै रोजी डॉ.हिकमत दादा उढान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन घनसावंगी मतदार संघातील सहा गावातून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला कायमचा रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केला .याविषयी अधिक माहिती अशी की,1 जुलै रोजी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ.हिकमत दादा उढान यांचा वाढदिवसअसल्याकारणाने त्यांच्या घनसावंगी येथील संपर्क कार्यालयात सकाळपासून त्याना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्व सामान्य जनता उपस्थित होती.त्यातच त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी ला कायमचा रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.त्यामध्ये पारडगाव येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंच सय्यद मुमताज भाई,विक्राम कुरेशी,हबीब कुरेशी,विष्णु सुतार,मुस्ताक पटेल,नजीर कुरेशी,इकबाल कुरेशी,अखिल कुरेशी,अक्षय अढाव,ताहेरभाई,कलाम कुरेशी यांच्या सह तीस कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तर राहेरा येथील आत्माराम कोरडे,गजानन कोरडे,दादासाहेब कोरडे,अक्षय कोरडे,संभाजी गायकवाड़,बद्रीनाथ गायकवाड,रामप्रसाद गायकवाड पांगरा येथील राजू शेठ,राजाराम वाघ्राळ,शामराव लांडगे,आबासाहेब वाघ्राळ, बंडू आढे,गणेश लांडगे येवला येथील कैलास राठोड,अमोल पवार,राम राठोड,संदीप पवार, जाधव, न्यानेश्वर राठोड घोंसी येथील शेख मुन्सी शेख बशीर,शेख बाबू,
अंतरवाली येथील रामकिसन माकोड़े,दत्ता गोरे,या सर्व प्रवेशकर्त्या कार्यकर्त्याचे डॉ.हिकमत दादा उढ़ान व उपनेते लक्ष्मण राव वडले यानी स्वागत केले.तर डॉ हिकमत दादा उढान यानी जुन्या शिवसैनिकाचा नव्या पिढीतील शिवसैनिकानी आदर करावा असे सांगितले तर शिवसेना साखर कारखान्याची ही निवडणूक लढवणार असल्याचे उपनेते लक्ष्मण राव वडले यानी सांगितले.
إرسال تعليق