बाळासाहेबांनी काढलेली शेवटची व्यंगचित्र
बाळासाहेबांनी 4 एप्रिल 2012 ला काढलेलं व्यंगचित्र
बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही व्यंगचित्र काढताना शेवटचं कधी पाहिल?
तुम्हाला आठवतही नसेल.
एक थोर राजकारणी अशी बाळासाहेबांची ओळख होतीच, त्याशिवाय एक थोर व्यंगचित्रकार म्हणूनही बाळासाहेब ओळखले जायचे.
वयोमानामुळं बाळासाहेबांचे हात थरथरायचे, त्यामुळं व्यंगचित्र काढणं जमत नव्हतं.
पण पिंपरी-चिंचवडच्या डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान व्यंगचित्र काढायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी आणि महात्मा गांधींची व्यंगचित्र काढली.
त्यानंतर बाळासाहेबांनी आणखी एक व्यंगचित्र काढलं.
एवढंच नाही तर बाळासाहेबांनी त्यांचा आवडता व्यंगचित्रकार असलेल्या डेव्हिड लोचीही व्यंगचित्र काढून दाखवली.हात थरथरत असतानाही बाळासाहेबांनी काढलेलं व्यंगचित्र वेगळीच छाप पाडतं.
काय म्हणतात डॉक्टर?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांनी शेवटचं व्यंगचित्र 4 एप्रिल 2012 ला काढलं. विशेष म्हणजे यावेळी चष्म्याशिवायचे बाळासाहेबही पहिल्यांदाच पाहायला मिळाले.
إرسال تعليق