भारतामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. हिंदू धर्मामध्ये स्त्रीला लोक देवीचे रूप मानतात. जर महिला नसेल तर जगातून मानव जात नष्ट होईल. पण आजच्या या कलयुगात महिलांची स्थिती वाईट आहे. आजही लोक घरामध्ये मुलगा होण्याची इच्छा ठेवतात. मुलगी होणे आजही अभिशाप समजले जाते. हे माहीत असूनही की एक महिलाच जगाची सुत्रधारक असते तरीही लोक तिचा सन्मान करत नाही. पण हे देखील मान्य करावे लागेल की काही प्रमाणात लोकांचे विचार बदलले आहेत. पण तरीही मागासलेल्या गावामध्ये मुलीच्या जन्मामुळे लोकांना दुखः होते. पण कदाचित या लोकांना माहीत नाही की आजच्या युगात महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या पेक्षा कमी नाही आहे. ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे.

नवरात्री मध्ये महिलांची पूजा लोक देवी मानून करतात. लग्न झाल्या नंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हाही लोक हेच बोलतात की लक्ष्मी आली आहे. त्याच सोबत स्त्रीला प्रेम, त्याग, ममता आणि क्षमा याचे प्रतीक मानले जाते. ती स्वताच्या अगोदर दुसऱ्याचा विचार करते.

आपल्या ऋषीमुनी लोकांचे मानणे आहे की ज्ञानी लोकांचे पाय पवित्र असतात, गायीचा मागील भाग पवित्र असतो आणि बकरी, घोडा यांचे डोके पवित्र असते. पण महिलेचा विचार केला गेल्यास ती सर्व भागाने पवित्र असते असे आपल्या ऋषीमुनी लोकांचे मानणे आहे. तरी हा विचार करणे बंद करणे योग्य राहील की स्त्री एका विशीष्ट भागाने पवित्र आहे किंवा अपवित्र आहे ती संपूर्ण पवित्र आहे. भारतातील केरळ राज्यात स्त्रीला विशेष महत्व दिले गेले आहे तेथे स्त्रीची पूजा केली जाते आईच्या रुपात, बहिणीच्या रुपात आणि पत्नीच्या रुपात देखील. केरळ मध्ये पुरुष आल्या पत्नीचे पाया पडतो जे उत्तर भारतात अमान्य आहे. स्त्री ही लक्ष्मीचे रूप आहे, दुर्गा आणि कालीचे देखील रूप आहे तर स्त्रीचा सन्मान करा आणि तिला योग्य वागणूक द्या.

लेख आवडला तर नक्की शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post