सामना प्रतिनिधी । कळमनरी
जैन मुनी आणि हिंदुधर्मीय बांधवांच्या रक्षणासाठी कळमनुरी शहरामध्ये शिवसेनेने रस्त्यावर उतरुन धर्माध मुस्लीम मवाल्यांना जोरदार उत्तर दिले. धर्माध मुस्लीमांनी वाट अडवलेल्या रस्त्यावर जैन मुनी विशेषसागर महाराज यांची सवाद्य मिरवणुक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. ‘जैन समाज किंवा हिंदुधर्मीयांवर धर्मांध मुस्लीम समाजकंटक व मवाल्यांनी दादागिरी केली तर अर्ध्या रात्री आवाज द्या, शिवसेना या धर्मांधांना जशाच तसे उत्तर देईल’, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरीवासीयांना दिलासा दिला.
जैन मुनी विशेषसागर महाराज कळमनुरी शहरात वास्तव्यास असून शुध्दीसाठी जात असतांना मुनींना व जैन समाजाच्या कार्यकर्त्यांना मुस्लीमांनी अडवून शिवीगाळ केली. तसेच या रस्त्यावरुन जाऊ नका, अशी धमकी दिली. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जैन मुनींची भेट घेतली. जैन मुनींना ज्या ठिकाणी मुस्लीमांनी अडविले होते त्याच बागवान गल्ली व असोलखान्यासमोरील मार्गावरुन विशेषसागर महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा दणदणाट व हिंदुत्वाचा जयकार करत ही मिरवणुक निघाली. यावेळी जैन मंदिरात आरती करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये राहुल मेणे यांच्यासह शिवसैनिक राम कदम, बाळासाहेब पारवे, बबलु पत्की, शिवा शिंदे, शिवराज पाटील, सुहास पाटील, ऍड. विश्वनाथ चौधरी, संतोष सारडा, ऍड. रवी शिंदे, अतुल बुर्से, विलास बुर्से, अभिनंदन बणसकर, शुभम बुर्से, सागर साकळे, श्रीकांत मांडवगडे, पारस जैन, आनंद कल्याणकर यांच्यासह जैन समाज बांधव उपस्थित होते.
कमंडलू जिल्हाप्रमुखांच्या हाती
जैन मुनी विशेषसागर महाराज यांनी त्यांच्या हातातील कमंडलू शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या हाती दिला. जैन मुनी त्यांच्या जवळील कमंडलू कोणा जवळही देत नाहीत. मात्र, विशेषसागर महाराजांनी जिल्हाप्रमुखांना हा मान दिला.
काँग्रेस खासदार-आमदार गप्प
दरम्यान, कळमनुरी शहरामध्ये जैन मुनींबद्दल मुस्लीमांनी असभ्य वर्तन करुन देखील काँग्रेसचे खासदार राजीव सातव व काँग्रेस आमदार संतोष टारफे यांनी चुप्पी साधली आहे. ही घटना घडुन देखील साधी विचारपुस देखील काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केली नसल्याचे भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Post a Comment