गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येण्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली होती. नेमकाच काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पहिला अधिकृत टिजर आणि पोस्टर सुद्धा रिलीज झाला आहे. बाळासाहेबांच्या या जीवनपटात त्यांची भूमिका साकारणार आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत 21 डिसेंबरला सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला. बाळासाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग या सिनेमात मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
सूत्रांच्या मते मा. शरद पवार यांचा सुद्धा या सिनेमात बाळासाहेबांसोबतचा सिन दाखवण्यात येणार आहे. शरद पवार आणि बाळासाहेब यांच्या कुटुंबाचा हा सिन असणार आहे. असे बोलले जात आहे की हा सिनेमा 2019 मधील सर्वात मोठा सिनेमा असणार आहे. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मराठी माणसांसाठी प्रेरणा आणि नेहमी बुलंद आवाज राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर एक सिनेमाही बनला आहे त्याच नाव आहे बाळकडू.
शिवसेना नेत्यांची इच्छा आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव जिवंत राहावेत. त्यांच्या मराठी माणसासाठी असलेल्या कार्याला युवा पिढी विसरु नये हा या सिनेमाचा उद्देश असल्याचे कळते. सेना नेते संजय राऊत हे मागील चार वर्षांपासून या स्क्रिप्टवर काम करत आहेत. कथा संजय राऊत यांनी तर अतुल काळे हे या सिनेमाचे डायरेक्टर आहेत.
सिनेमाचे म्युझीक रिलीज फंक्शन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडले होते. म्युझिक रिलीज वेळी संजय राऊत यांनी सांगितले की, ‘ आजच्या पिढीतील प्रत्येक तरुणाला बाळासाहेबांचे विचार माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. कारण बाळासाहेब हे नेहमी मारठी माणसाच्या प्रगती आणि हक्कासाठी लढत राहिले आहेत. सिनेमा हा एकमेव साधन वाटला ज्याने बाळासाहेबांचे विचार प्रत्येक युवकांपर्यंत लवकर पोहचू शकतात. त्यामुळे हा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला.’
या जीवनपटात शरद पवार यांची भूमिका अभिनेते बोमन इराणी साकारणार असल्याचे कळते. मुंबईत जन्मलेले बोमन हे शरद पवार यांच्या भूमिकेसाठी योग्य कलाकार ठरू शकतात. बोमन यांनी अनेक सुपरहिट सिनेमात काम केलेले आहे. ते त्यांच्या कॉमेडी आणि खलनायकांच्या भूमिकेसाठी सुद्धा ओळखले जातात.
हिंदी आणि मराठी अभिनता रितेश देशमुख म्हणतोय,‘ बाळासाहेबांचे विचार नेहमी प्रेरणा देत राहिले आहेत. बाळकडू ने सुद्धा त्यांचे विचार युवकांपर्यंत पोहचून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत राहील.’ बाळकडू सिनेमात दाखवले गेले होते की एका युवकाला नेहमी बाळासाहेबांचा आवाज ऐकू येत असतो. तो युवक बाळासाहेबांच्या पाऊलावर चालत असतो. बाळकडू सिनेमात बाळासाहेबांचा खरा आवाज सुद्धा टाकला गेला आहे. बाळासाहेबांचे अनेक डायलॉग या सिनेमात वेळोवेळी हिरोला ऐकू येतात.

Post a Comment

Previous Post Next Post