भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा गौप्यस्फोट
MNS राज ठाकरे यांना ब्लॅक कॅट कमांडोंचे झेड प्लस सुरक्षा कवच आवश्यक !
पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर भारताची सीमा नजरचुकीने ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना तब्लल चार महिने पाकिस्तानच्या तुरुंगात काढावे लागले. या काळात त्यांच्यावर अनन्वित मानसिक व शारीरिक अत्याचार केले गेले. पण मुळचा धुळ्याचा असलेल्या या मर्दमराठ्याने भारतमातेसाठी हे सगळं सहन केलं. भारत सरकारनेही सर्व ताकद पणाला लावून त्यांना पुन्हा मायदेशी आणलं. पण दोन-चार दिवसांपासून चंदू चव्हाण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. यावेळी निमित्त आहे ते, त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचं... या मुलाखतीतील मुद्दे व्हायरल झाले आहेत.
"पाकिस्तान लष्कराचे अधिकारी राज ठाकरेंबाबत वाईट बोलायचे" असा गौप्यस्फोट चंदू चव्हाण यांनी या मुलाखतीत केला आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकारी चंदू चव्हाणांचं मनोधैर्य खचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरायचे, असं चंदू चव्हाण यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. सर्जिकल स्ट्राइक करणा-या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा द्वेष पाक लष्कराने करणं आपण समजू शकतो, पण राज ठाकरेंचा द्वेष कशासाठी ?
काय कारण असेल याचं ?
याचं खरं कारण आहे- पाकिस्तानविरोधात राज ठाकरे यांनी सातत्याने घेतलेली ठाम विरोधाची भूमिका.
सर्जिकल स्ट्राइकनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. इतकंच नव्हे तर, "भारतीय लष्कराने पितृपक्षातच पाक सैन्याचे श्राद्ध घातले" अशी खोचक टिप्पणीही राज ठाकरे यांनी तेव्हा केली होती. पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान असो वा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायमच पाकिस्तानी कलावंतांना विरोध केला. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या माॅल्समधील 'जाऱा' या पाकिस्तानी कपड्यांच्या ब्रॅण्डच्या दुकानांची नासधूस केली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत ज्यांनी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता कायम पाकिस्ताविरोधात आपला खणखणीत आवाज उठवला. बाळासाहेबांना कायमच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा धोका होता. पण जीविताला धोका आहे, म्हणून बाळासाहेबांनी आपली पाकिस्तानबाबतची भूमिका कधीही बदलली नाही. सरकारनेही म्हणूनच त्यांना झेडप्लस सुरक्षाव्यवस्था दिली होती. आता भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तान लष्कराचे काय विचार आहेत, हे उघड झालं आहे. पोलिसांच्या आणि लष्कराच्या गोपनीय अहवालांनुसार, राज ठाकरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांना ब्लॅक कॅट कमांडोंचे झेड प्लस सुरक्षा कवच देणं, ही सरकारची जबाबदारी आहे.
प्र.वा.कुलकर्णी,
निवृत्त लष्कर अधिकारी
Post a Comment