बारावी झाल्यानंतर इंजिनीयरिंग, फार्मसी, लॉ आणि मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एमएच-सीईटी, नीट अशा परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी युवासेनेच्या कडून काल म्हणजेच रविवार दि: १५-३-२०१८ ला घेण्यात आलेल्या ‘मॉक सीईटी’ म्हणजेच सराव परीक्षेला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. तर २११ केंद्रांवर ३६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही सराव परीक्षा दिली आहे. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वांद्रे, परळ आणि वडाळा येथील परीक्षा केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तसेच त्यांच्या पुढील परीक्षेसाठी त्यांना शुभेच्या देखील दिल्या.
युवासेनेचे हे सलग तिसरे वर्ष असून त्यानुसार रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही सराव परीक्षा सुरळीत पार पडली. ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३४७०१ होती तर त्या व्यतिरिक्त ३००० हून अधिक नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन पेपर सोडवला आहे. परीक्षा संपल्यानंतर ही विद्यार्थ्यांना मॉडेल सोल्यूशन सेटचे वितरण परीक्षा केंद्रावर करण्यात आले, ज्यावर सोल्यूशनसोबत QR Code स्कॅन करून विद्यार्थी त्याचा व्हिडीओ Online पाहू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी सर्व प्रश्नपत्रिका व मॉडेल सोल्यूशन सेट युवसेनेच्या खाली दिलेल्या www.ys-cet.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
युवासेना पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या स्वरूपात सराव परीक्षांचे आयोजन करणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले व तसेच पुढील वर्षी आर्किटेक्चर सीईटीसाठीही परीक्षा घेणार असल्याचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, उपसचिव सिद्धेश धाऊस्कर, सहसचिव चैतन्य बनसोडे, प्रथमेश वराडकर, अभय चव्हाण, जसप्रीत सिंग वढेरा यांच्यासह विभाग युवा अधिकारी, जिल्हा युवा अधिकाऱयांनी या परीक्षेचे आयोजन व नियोजन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.त्यांच्या ह्या मेहनतीला सर्व स्तरावरून विशेष कौतुक केले जात आहे.
मुंबईमधून सर्वाधिक ६५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, तर त्या पाठोपाठ अकोला येथे २०१५, नाशिक १४३२, कोल्हापूर ९२३, धुळे ८५०, चंद्रपूर ६५७, बीड ६५२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच एकही पेपर फुटला नाही
विद्यार्थ्यांच्या मनात सीईटी, नीटबाबत असलेली व बसलेली भीती दूर झाली पाहिजे. त्यासाठी युवासेना गेल्या तीन वर्षांपासून अश्या सराव परीक्षा आयोजन करत आली आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दुप्पट होत गेला असल्याचेही सांगितले जात आहे.
एकही पेपर फुटला नाही, ना विद्यार्थ्यांची गैरसोय झाली असे आदित्य ठाकरे यांनीे सांगितले.
येणाऱ्या काळात ह्या पेक्षा अधिक मूला-मुलीं युवासेनेकडून आयोजित केल्या जात असलेल्या परीक्षासाठी सामोरे जातील हे निश्चितच.
Post a Comment