व्हीजेटीआयला लांछनास्पद ठरलेल्या प्रकरणाला
व्हीजेटीआय चे संचालक हेच विद्यार्थिनीच्या विनयभंगाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करित आहेत असा आरोप आता होतो आहे
या आरोपांला बळकटी मिळावी असाच कारभार संचालक करित आहेत.
१) शुक्रवार १८ /५/२०१८ ला पिडित मुलीला , केवळ एका सही साठी दिवसभर ताटकळत ठेवून ,सर्व जण निघून गेल्यानंतर सायंकाळी ५.१५ ठरवून मुलीचा प्रा बी जी बेलापट्टी या मँथेमँटीक्स शिकविणा-या प्राध्यापकाने विनयभंग केला.
२) मुलीने कुठलाही वेळ न दवडता तातडीने पालकांना सोबत घेवून, त्याच रात्री ८ वाजता संचालक धिरेन पटेल यांची , त्यांच्या व्हीजेटीआय कँम्पस मधिल बंगल्यात जावून भेट घेतली .
संपूर्ण प्रकार कथन केल्यावर संचालकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून , तेव्हाच लेखी निवेदन घ्यायला हवे होते.
तसे न करता ,
संचालकांनी मुलीला व पालकांना दुसरे दिवशी म्हणजे शणीवारी बोलावून लेखी तक्रार घेण्यात, एक दिवसाचा जाणिवपुर्वक विलंब केला. गुन्हेगार प्राध्यापकाला तातडीने निलंबित करण्या ऐवजी सुटीवरती पाठविले हे या विलंबामागचे कारण होते, असा आरोप आता संचालकावरच होतो आहे.
३) लेखी तक्रार मिळाल्यानंतर तरी गांभीर्याने दखल घेवून तक्रारीतील मजकुराची भयानकता लक्षात घेवून व सदर पिडीत मुलगी ही मागासवर्गिय समाजाची याची दखल घेवून, तातडीने पोलिसात तक्रार दाखल करायला हवी होती.
संचालकांनी यापैकी कुठलीही कारवाई न करता वेळकाढू धोरण अवलंबीले. हे अपराध्याला पाठीशी घालण्यासाठीच केले गेले आहे हे स्पष्ट होते.
४) सोमवारी २१ तारखेला संचालकांनी वुमन सेल च्या माध्यमातून मुलीला आपले म्हणणे मांडण्याचा ' तोंडी ' निरोप दीला.
ही कामाची पद्धत प्रचंड चिड आणणारी आहे व संचालकांच्या ढीसाळ कारभाराचा नमुना आहे. मुलीच्या तक्रारी चा उल्लेख करून , कुठल्या प्रकारची समिती गठीत झाली आहे , याच्या माहीतीसह लेखी पत्र , पिडित मुलीला तसेच आरोपी प्राध्यापकाला शो काँज नोटिस देणे आवश्यक असतांना, मोबाईल वरून ' तोंडी ' निरोप पाठविणे अनाकलनीय आहे. मुलीने व पालकांनी तातडीने बंगल्यात जावून तोंडी तक्रार देताच , ' लिखित ' स्वरुपात मागणी संचालक करतात. परंतू समितीचे कामकाज ' तोंडी ' चालवितात, हे जाणिवपुर्वक केले जात आहे.
५) घटणेला १० दिवसांचा कालावधी उलटून जावूनही आजतागायत मुलीला लेखी स्वरुपात कुठलेच पत्र मिळालेले नाही. सर्वकाही ' तोंडी ' च चालविण्यामागचा हेतू , हे प्रकरण दडपणे हाच आहे , हे स्पस्ट होतं
Post a Comment