धायाशिवचे खासदार कामगिरी दमदार
========================
उमरगा :
शिवसेना उपनेते मा.विजय कदम यांच्या शिवविद्या प्रबोधिनी द्वारे 800 होतकरू विद्यार्थ्यांना IAS व इतर केंद्रीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी एक वर्ष मोफत प्रशिक्षण (निवास व जेवनासह) दिले जाते. व यासाठी पात्रता परीक्षा घेऊन महाराष्ट्रतुन 100 विद्यार्थी निवडले जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही परीक्षा *उमरगा शहरात* घेण्यात आली.
उमरगा व परिसरातील 50 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमास *खा.प्रा.रवींद्र गायकवाड* यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच जेष्ठ नेते जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, विद्यार्थो सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, शरद पवार, गटनेते संतोष सगर, संदीप चव्हाण, बळी पवार, सलिम शेख आदी उपस्थित होते.
सदर परीक्षा ही *चैतन्य कोचिंग क्लासेस, बालाजी नगर उमरगा* येथे घेण्यात आली.
إرسال تعليق